
महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे.
महाराष्ट्र राज्य ३६ जिल्ह्यांत विभागले गेले आहे. या जिल्ह्यांचे ६ समूह अथवा महसुली विभाग आहेत- पुणे , नाशिक , [छत्रपती संभाजीनगर विभाग|छत्रपती संभाजीनगर]] , कोकण , नागपूर व अमरावती . हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजस्व विभाग आहेत. भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय-मतांनुसार महाराष्ट्रात पाच मुख्य विभाग आहेत: देश पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे विभाग), उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक विभाग), मराठवाडा (औरंगाबाद विभाग), विदर्भ किंवा बेरार (नागपूर आणि अमरावती विभाग) , आणि कोकण (कोकण विभाग). २०१४ साली ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मीती करण्यात आली, त्यामुळे एकूण जिल्ह्यांची संख्या वाढून ३६ एवढी झालेली आहे.